congress jansangharsha yatra in indpaur | Sarkarnama

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटलांना मिळणार कां? अशोक चव्हाण उद्या बोलणार! 

​राजकुमार थोरात 
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

राज्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्‍यता असली तरीही तालुक्‍यात दोन्ही पक्षामध्ये बिघाडी झाली असुन आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा सुरु आहे. 

वालचंदनगर (पुणे) : कॉग्रेसची जनसंघर्ष यात्रा बुधवारी पुणे जिल्हात प्रवेश करीत असून पहिली सभा इंदापूरमध्ये होणार आहे. या सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीच्या जागावाटपात इंदापूरच्या जागा कॉंग्रेसला मिळविण्यासाठी ठोस भूमिका मांडणार असल्याचे समजते. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनसंघर्ष यात्रेचे नियोजन केले असून तालुक्‍यातील वाड्यावस्त्या, गावातून हजारो युवक इंदापूर शहरामध्ये येणार आहेत. पाच हजार दुचाकांची रॅली काढण्यात येणार असुन याबरोबर चारचाकी गाड्याही असणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंथुर्णेमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करुन शक्तीप्रदर्शन केले होते. जनसंघर्ष यात्रेमुळे हर्षवर्धन पाटील यांना शक्तीप्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. 

इंदापूर तालुक्‍यातुन ही यात्रा बारामती व जेजुरी मार्गे भोर विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे. भोर मतदारसंघामध्ये जाहिर सभा होणार आहे. बुधवारचा मुक्काम पुणे शहरामध्ये होणार आहे. शनिवारी पहिल्या टप्यातील यात्रेचा समारोप पुण्यामध्ये होणार आहे. 
 

संबंधित लेख