भाजपच्या शक्ती केंद्राला कॉंग्रेसकडून `चलो पंचायत`चे उत्तर!

भाजपच्या शक्ती केंद्राला कॉंग्रेसकडून `चलो पंचायत`चे उत्तर!

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्राचा सामना करण्यासाठी कॉंग्रेसनेदेखील चलो पंचायत अभियान सुरू केले आहे. या अभियानाची धुरा युवक कॉंग्रेसकडे सोपविली आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी व युवकांना जोडण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. 

या अभियानाच्या माध्यमातून युवकांकडून युवा शक्ती कार्ड भरून घेण्यात येत आहे. तर "मिस्ड कॉल'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडून घेण्याची योजना आखण्यात आली आहे. गरजू व बेरोजगार युवकांना मासिक बेरोजगार भत्ता, जिल्हा रोजगार व सवयंरोजगार केंद्रांचे सक्षमीकरण,विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहांची निर्मिती, सुलभ व्याजदराने शैक्षणिक कर्जाची सुविधा, व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखांपर्यंत विनातारण, बिनव्याची कर्जाची सोय करण्यात येईल, असे अश्‍वासन देण्यात येत आहे.

शहर पातळीवर या अभियानाला सुरवात करण्यात आली असून प्रभागनिहाय काम सुरू करण्यात आल्याचे पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून युवकांकडून युवा शक्‍ती कार्ड भरून घेण्यात येत आहे. या कार्डचा उपयोग मासिक भत्ता तसेच सरकारी योजनांसाठी भविष्यात करण्यात येणार असल्याचे मलके यांनी सांगितले.

या अभियानाला पुण्यातून युवकांचा चांगला प्रतिसिाद मिळत या कामासाठी प्रत्येक प्रभागात चार समन्वयक नेमण्यात आले आहेत. येत्या महिन्यात शहरातील सर्व प्रभागातून मोठ्या संख्येने युवकांचा डाटा एकत्र करण्याचे येणार आहे, असे मलके यांनी सांगितले. 

एकिकडे शहर पातळीवर हे काम सुरू असताना गावागावात ग्रामपंचायत पातळीवरदेखील अभियान राबविण्यात येणार आहे. या शिवाय शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी मिस्ड कॉल मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. त्यासाठी एक फोन क्रमांक देण्यात आला आहे. या मोबाईल फोनवर ज्यांचे मिस्ड कॉल येतील अशा शेतकऱ्यांची यादी बनविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com