congress gets shock in nagar | Sarkarnama

नगरमध्ये कॉंग्रेसला 'दे धक्का'

मुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नगर - आपत्ती आली की ती चारही बाजूंनी  येते, असं म्हणतात.  जिल्ह्यात कॉंग्रेसचे असेच काहीसे  झाले आहे. नगरपालिकेतील अपयशानंतर पक्षातील फुटीचा धक्का कॉंग्रेसच्या नेत्यांना डोईजड होऊ लागला आहे. श्रीरामपूर नगरपालिकेत आठ नगरसेवकांनी गटनेते अंजूम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र गटाची नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. "भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस श्रीरामपूर शहर विकास गट' असे नवीन गटाचे नाव आहे. 

जिल्ह्यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्याकडे  जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षवाढीची जबाबदारीआहे. नगरपालिकेतील निवडणुकीत नेते व कार्यकर्त्यांची फळी बांधण्याचे काम करण्यात त्यांना अपयश आले. त्याचा परिणाम बहुतेक नगरपालिकांमध्ये कॉंग्रेसचे कमी उमेदवार निवडून आले. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर नगरपालिकेत वगळता कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले नाही. ससाणे यांच्याच कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर नगरपालिकेत नगरसेवक जास्त निवडून आले. पण स्वतःची पत्नी राजश्री ससाणे यांना निवडून आणता आले नाही. हा धक्का ससाणे यांनाही पचविता आला नाही. ही अस्वस्थता असतानाच राहाता नगरपालिकेतही राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही त्यांचा स्वतःचाच गड राखता आलेला नाही. जिल्ह्याच्या कॉंग्रेसच्या दृष्टीने हा दुसरा मोठा धक्का ठरला आहे.
 
श्रीरामपूर नगरपालिकेतील कॉंग्रेसच्या बावीसपैकी आठ सदस्यांनी आज स्वतंत्र गट स्थापन करून वेगळी चूल मांडली.  पक्षाच्या स्थानिक नेत्यांची  हुकूमशाही मान्य नसून, पालिकेत आमचा कोणालाही पाठिंबा नसल्याचे या गटाचे नेते अंजूम शेख व उपनेते श्‍यामलिंग शिंदे यांनी सांगितले आहे.

कॉंग्रेसमध्ये हुकुमशहा
श्रीरामपूरध्ये वेगळी चूल मांडताना अंजुम शेख यांनी ससाणे यांच्यावर आगपाखड करीत कॉंग्रेसमधील दुही पुन्हा उजेडात आणली. ""जयंत ससाणे यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत पक्षप्रतोद, समित्यांची निवड या विषयांवर चर्चा न करता सदस्यांना हुकूमशाही पद्धतीने स्टँम्प पेपरवर सह्या करण्यास सांगण्यात आले. ते मान्य नसल्याने आम्ही सह्या केल्या नाहीत.'' असे शेख यांनी उत्तर दिल्याने कॉंग्रेसमधील हुकुमशाही चव्हाट्यावर आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख