congress farmer lolypop | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

कॉंग्रेसची कर्जमाफी म्हणजे "लॉलीपॉप'

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

गाझीपूर (उत्तर प्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा कॉंग्रेसवर टीका करत शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण न केल्याबद्दल कॉंग्रेसश्रेष्ठींना धारेवर धरले. धर्मनिरपेक्ष जनता दल आणि कॉंग्रेस यांची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्येही फार कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

कॉंग्रेसचे कर्जमाफीचे आश्‍वासन हे लॉलीपॉप असून, कर्नाटकमध्ये केवळ आठशे शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. लोकांना कॉंग्रेसच्या खोटेपणापासूनच सावध राहायला हवे, असे ते म्हणाले. ते येथे आयोजित सभेत बोलत होते. मोदींच्या उपस्थितीत आज वाराणसी आणि गाझीपूर येथे 499 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. 

मोदी म्हणाले, ""कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षांनी मागील दाराने सरकार स्थापन केले, कर्जमाफीचा लाभ मात्र केवळ आठशे शेतकऱ्यांनाच मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी पोलिस लावण्यात आले. कॉंग्रेस पक्ष ही लॉलीपॉप कंपनी आहे. सध्या देशाचा चौकीदार दिवस रात्र मेहनत करत असल्याने चोरांना झोप येत नाही. एके दिवशी या सर्व चोरांना योग्य ठिकाणी नेण्यात येईल.'' 

संबंधित लेख