congress election stratygy marathawada | Sarkarnama

लोकसभा, विधानसभेसाठी कॉंग्रेसने कंबर कसली 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

औरंगाबादः आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी कॉंग्रेस पक्षाने कंबर कसली. राज्यातील बुथ कमिट्या स्थापन केल्यानंतर आता अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आमदार संपत कुमार, सोनल पटेल आणि आशिष दुवा हे 3 आणि 4 ऑगस्ट रोजी मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. 

औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड या सहा जिल्ह्यात शुक्रवारी (ता.3) तर जालना, हिंगोली आणि पुन्हा औरंगाबादमध्ये हे पथक शनिवारी (ता.4) कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि आढावा घेणार आहेत. 

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे प्रभारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष युवक कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष महिला कॉंग्रेस, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या सेलच्या जिल्हाध्यक्षांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या आढावा बैठकी दरम्यान, आगामी लोकसभा, विधानभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी, बुथ कमिट्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या आदेशानूसार राज्यभरातील बुथ कमिट्यांचा आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन घेतला होता. 

तेव्हा बुथ कमिट्यांच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत या कमिट्या तात्काळ स्थापन करण्याच्या सूचना कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याचा आढावा देखील सचिव आणि सहप्रभारींकडून घेतला जाणार असल्याचे समजते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख