congress and chandrababu fight jointly in telangana | Sarkarnama

मोदींना टक्कर देण्यासाठी चंद्राबाबू कॉंग्रेसमवेत 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

हैदराबाद : तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंद्राबाबू नायडू आणि कॉंग्रेस एकत्र येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणूकीत टक्कर देण्यासाठी आंध्रातील एन.चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्षाने यूपीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. 

या निर्णयाचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी स्वागत केले आहे. तेलगु देसम सध्या तेलंगण विधानसभेच्या सात जागांच्या वाटपासंदर्भात कॉंग्रेसबरोबर बोलणी करत आहे. 

आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज न दिल्याने नाराज झालेले चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांची साथ सोडली. आता तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीसाठी नायडू यांनी यूपीएत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विरप्पा मोईली म्हणाले, की, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. तेलंगण विधानसभेसाठी झालेली आघाडी ही आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिल, असेही सूतोवाच केले. 

चंद्राबाबू यापूर्वी मोदींबरोबर होते. कॉंग्रेसच्या पराभवासाठी त्यांनी भाजपला साथ दिली होती. आज ते पुन्हा भाजपच्या विरोधात गेले असूून त्यांना केंद्रात मोदींची राजवट नको आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींना कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी कॉंग्रेस देशातील समविचारी प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यासाठी नमतेही घेत असल्याचे दिसून येते. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे चंद्राबाबू नायडू हे कडवे विरोध म्हणून ओळखले जातात. टीडीपी आणि कॉंग्रेस एकत्र येऊन चंद्रशेखरराव यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज झाले आहे. 

संबंधित लेख