आमदार प्रवीण दरेकरांकडून सहकार संघात तोडफोड : कॉंग्रेसचा आरोप 

सहकारी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गटांनी गोंधळ घातला. या गोंधळात निवडणूक होऊ शकत नसल्याचे पत्र सहकार विभागाचे उपनिबंधक आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविले आहे.
आमदार प्रवीण दरेकरांकडून सहकार संघात तोडफोड : कॉंग्रेसचा आरोप 

पुणे : राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीच्या वादातून भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर व त्यांच्या समर्थकांनी संघाच्या पुण्यातील कार्यालयाची मोडतोड केल्याचा आरोप कॉंग्रेसच्यावीतने करण्यात आला आहे. तर अमोल घुले या कार्यकर्त्याने मुंबई बॅंकेचे संचालक नितीन बनकर यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप आमदार प्रवीण देरकर यांनी केला आहे. राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत दोन परस्पर पॅनेलमध्ये वाद उत्पन्न झाल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

सहकारी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गटांनी गोंधळ घातला. या गोंधळात निवडणूक होऊ शकत नसल्याचे पत्र सहकार विभागाचे उपनिबंधक आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविले आहे. 

मुंबई सहकारी बॅंकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले यांनी रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महिला प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष आणि या संस्थेच्या विद्यमान संचालिका विद्या पाटील तसेच विद्यमान संचालिका सुनीता माळी यांनी आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला, असा आरोप केला आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सभागृहामध्ये आज सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्याठिकाणी खुर्च्या आणि टेबल तोडण्यात आले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि संजीव कुसाळकर यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक झाली होती. दरेकर हे या संस्थेच्या मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनेलने आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला, असे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com