congress agitation against CM | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना पार्डीत दाखवले काळे झेडे.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मे 2017

जलयुक्त शिवार कामाची पाहणी करण्यास उस्मानाबाद दौऱयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. 

उस्मानाबाद : जलयुक्त शिवार कामाची पाहणी करण्यास आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. 

पार्डी (ता. वाशी जि. उस्मानाबाद) येथे आज सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी हे कार्यकर्ते थेट मुख्यमंत्री शेततळ्याची पाहणी करत असतानाच अचानकपणे समोर आले. त्यांनी हा कर्जमुक्तीच्या घोषणा देत हा प्रकार केला. या प्रकरणी सात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारानंतर मुख्यमंत्री हिवरा (ता. भूम) येथे रवाना झाले.

फोटो फीचर

संबंधित लेख