फडणवीस सरकारविरोधात कॉंग्रेस जनआक्रोश करणार 

फडणवीस सरकारविरोधात कॉंग्रेस जनआक्रोश करणार 

मुंबई ः फसवी कर्जमाफी, जीएसटीचे तीन तेरा, नोटाबंदीमुळे सामान्यांचे हाल, यासारख्या सरकारच्या अनेक अपयशी गोष्टींच्या विरोधात कॉंग्रेस राज्यभर जनआक्रोश सप्ताह राबवणार आहे.

तीन वर्षाच्या निराशाजनक कामगिरीच्या विरोधातील हा जन आक्रोश 31 ऑक्‍टोबर रोजी नगर येथून सुरू होऊन 8 नोव्हेंबरला सांगली येथे संपणार आहे. नोटाबंदीला 8 नोव्हेबंरला एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती कॉग्रेस नेत्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. 

कर्जमाफी म्हणजे सरकारने चालवलेल्या आकड्यांचा हा फसवा खेळ आहे. यामधून शेतकऱ्यांचा हाती काहीही लागले नाही. जाचक अटी शर्ती घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्याचे काम सुरू आहे. दररोज नवे जीआर काढून नियम बदलले जात आहेत आणि तारीख पे तारीख असे सरकारचे काम सुरू आहे अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. तर नोटाबंदीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीला एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

कर्जमाफीच्या गोंधळावरून सहकार आणि आयटी विभागात वाद सुरू झाला आहे. रोज वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. कर्जमाफीचा आकडा कमी होत चालला आहे. तर यामध्ये समाविष्ट झालेल्या बोगस नावांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तर कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन या सरकारने शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 


सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही आस्था नसलेल्या या असंवेदनशील सरकारच्या विरोधात तयार झालेला जनआक्रोश नागपूरच्या अधिवेशनावरही धडकणार आहे. मुंबईत झालेल्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जनआक्रोश सप्ताह करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com