congress activity in dadar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

आक्रमक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची दादरमध्ये निदर्शने

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : शेतकऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना तेथील पोलिसांनी अटक केली. याचे पडसाद मुंबईत त्वरित उमटले. कॉंग्रेसच्या संतप्त युवक कार्यकर्त्यांनी दुपारी घाटकोपर येथे रेल्वे रोको आंदोलन केले तर सांयकाळी दादर येथे मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसकडून हाताला, कपाळाला काळ्या पट्ट्या लावून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. 

मुंबई : शेतकऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना तेथील पोलिसांनी अटक केली. याचे पडसाद मुंबईत त्वरित उमटले. कॉंग्रेसच्या संतप्त युवक कार्यकर्त्यांनी दुपारी घाटकोपर येथे रेल्वे रोको आंदोलन केले तर सांयकाळी दादर येथे मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसकडून हाताला, कपाळाला काळ्या पट्ट्या लावून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. 

दादर येथील टिळक भवन येथे संतप्त कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत घोषणांच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. संतप्त कार्यकर्त्यांच्या आवेशापुढे बंदोबस्ताला आलेला मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तही काही प्रमाणात फिका पडल्याचे पहावयास मिळाले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसकडून ही निदर्शने करण्यात आली. 

या निदर्शन कार्यक्रमात महिला व युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेला पहावयास मिळाला. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेसचे पदाधिकारी या निदर्शनात सहभागी झाले होते.कॉंग्रेस भवनापासून सुरू झालेली निदर्शने लगतच्या रस्त्यावर जाऊन उड्डाण पुलाखालील दोन्ही बाजूचे रस्ते काही काळ अडविण्याचा प्रयत्नही कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. 

काही वेळातच पोलिसांनी हा ताफा पुन्हा कॉंग्रेस कार्यालयाजवळ आणला. निदर्शन कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांकडे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना मोदींच्या निषेधार्थ घोषणाही यावेळी बराच वेळ देण्यात आला. एरव्ही शांत असणारा कॉंग्रेसी कार्यकर्ता यावेळी मात्र कमालीचा आक्रमक व संतप्त झालेला प्रथमच पहावयास मिळाला. 

संबंधित लेख