congres leader use social media for election | Sarkarnama

कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी नागपूरमध्ये सोशल मिडीयाचा वापर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब अजमाविण्यासाठी कॉंग्रेसमध्ये चांगलीच स्पर्धा लागली असून उमेदवारीसाठीचा आपला दावा मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मिडीयाचा वापर करण्याला सुरूवात केली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे तेच उमेदवार राहतील, हे स्पष्ट आहे. त्यांची प्रतिमा व नागपुरात झालेल्या विकास कामांमुळे त्यांना आव्हान देणे कठीण आहे. तरीही कॉंग्रेसमध्ये निवडणूक लढविण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल सातजण इच्छुक आहेत.

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब अजमाविण्यासाठी कॉंग्रेसमध्ये चांगलीच स्पर्धा लागली असून उमेदवारीसाठीचा आपला दावा मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मिडीयाचा वापर करण्याला सुरूवात केली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे तेच उमेदवार राहतील, हे स्पष्ट आहे. त्यांची प्रतिमा व नागपुरात झालेल्या विकास कामांमुळे त्यांना आव्हान देणे कठीण आहे. तरीही कॉंग्रेसमध्ये निवडणूक लढविण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल सातजण इच्छुक आहेत. आता या इच्छुकांपैकी कुणाला लॉटरी लागेल, हे सांगणे कठीण असले तरी आपले घोडे दामटण्यासाठी आता प्रत्येकाने सोशल मिडीयाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. 

कॉंग्रेसच्या इच्छुकांमध्ये माजी खासदार व माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार नाना पटोले, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री नितीन राऊत, भाजपचे बंडखोर आमदार आशीष देशमुख व माजी खासदार अविनाश पांडे यांची नावे चर्चेत आहेत. अनेकांनी फेसबुकवर सर्व्हे सुरू केले आहेत. यात या उमेदवारांपैकी आपण कुणाला उमेदवार म्हणून पसंती देणार? असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका सर्वेक्षणात नाना पटोले व दुसऱ्या एका सर्वेक्षण प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या उमेदवारीला पसंती मिळाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनीही नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात थेट टीका करणारे नाना पटोले यांनी या सर्वेक्षणात बाजी मारली आहे. दुसऱ्या एका सर्वेक्षण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत गडकरींचा सामना करणारे विलास मुत्तेमवार यांना मात्र फारच कमी लोकांनी पसंती दिल्याने नागपूर शहर कॉंग्रेसवर वर्चस्व ठेवणाऱ्या गटाला जोरदार धक्का बसला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख