Complaint against Sena Mla from Bhandup | Sarkarnama

आमदारा विरोधात मारहाणीचा गुन्हा : शिवसेनेने आरोप फेटाळले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

शिवसेनेच्या तिकीटावर पाटील यांच्या पत्नी मिनाक्षी पाटील निवडणुक लढवत आहेत. तर, भाजपने जागृती पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप मध्ये पहिली ठिणगी पडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार भांडूप पोलिस ठाण्यात केली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : भांडूप येथील प्रभाग क्रमांका 116 मध्ये 11 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप मधील पहिला वाद झडला आहे. शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांच्या विरोधात आज मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,पाटील यांनी हे आरोप फेटाळले असून पोलिसांवर दबाव टाकून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला.

शिवसेनेच्या तिकीटावर पाटील यांच्या पत्नी मिनाक्षी पाटील निवडणुक लढवत आहेत. तर, भाजपने जागृती पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप मध्ये पहिली ठिणगी पडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार भांडूप पोलिस ठाण्यात केली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 'मारहाणीचा प्रकार झालाच नव्हता. हवेतर सीसीटीव्हीचे फुटेज तपासा. पोलिसांनी हा गुन्हा भाजपच्या दबावामुळे दाखल केला आहे', असा आरोप पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्यासह सिराज खान यांच्या वरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीखंड वाटपात वाद
''भांडूप मध्ये गणपती मंडळा मार्फत दसऱ्याच्या निमीत्ताने श्रीखंडाचे वाटप केले जात होते. तेथे मी उभा असताना भाजपच्या एका कार्यकर्त्याने येथे काय करता? असे विचारले. त्यावर फक्त थोडी शाब्दिक चकमक झाली. मारहाणीचा प्रकार झाला नाही. हे पोलिसांनाही सांगितले होते. मात्र,त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला असेही पाटील यांनी नमुद केले.''

संबंधित लेख