राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यातही तक्रार

राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यातही तक्रार

पुणे : जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना मारहाण करणाऱ्या घटनेचा निषेध करताना पिडीत मुलांची ओळख पटेल असा 'व्हीडीओ' प्रसारीत केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल झाली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात आज ही तक्रार दिली आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्‍यातील वाकडी या गावी चार दिवसांपूर्वी ही घटना घडली. या घटनेचा राज्यभर निषेध होऊ लागल्यानंतर राहूल गांधी यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला. मात्र यावेळी त्यांनी सोबत जो "व्हीडीओ' प्रसारीत केला. त्यामध्ये पिडीत मुलांची ओळख पटेल अशा प्रकारे व्हीडीओ टाकण्यात आला होता. या कारणावरून गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राहुल यांच्या विरोधात बाल हक्क आयोगाकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली आहे. तक्रारीची दखल घेत आयोगाने राहूल गांधी यांना मंगळवारी नोटीस बजावली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात तक्रार झाली असून रात्री उशीराप्रर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या तक्रारीची माहिती बालहक्क आयोगाने मागितल्याचे सांगण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com