complaint against mla tilekar to ACB | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

आमदार टिळेकर यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसरमधील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. येवलेवाडी येथील विकास आराखड्यात टिळेकर यांनी बांधकाम व्यावसायिकांना फायदा करून देण्यासाठी एक कोटी सात लाख रूपयांची मर्सिडीस फाॅरमॅटिक कार ही भेट स्वरूपात स्वीकारली असल्याच्या आरोपाचा या तक्रारीत पुनरूच्चार करण्यात आला आहे.

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसरमधील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. येवलेवाडी येथील विकास आराखड्यात टिळेकर यांनी बांधकाम व्यावसायिकांना फायदा करून देण्यासाठी एक कोटी सात लाख रूपयांची मर्सिडीस फाॅरमॅटिक कार ही भेट स्वरूपात स्वीकारली असल्याच्या आरोपाचा या तक्रारीत पुनरूच्चार करण्यात आला आहे.

मोरे यांच्या आरोपाविरुद्ध टिळेकर यांनी दहा कोटी रूपयांच्या बदनामीच्या दाव्याचा नोटीस या आधीच दिली आहे. त्यानंतर मोरे यांनी एसीबीकडे आता याबाबत दाद मागण्याचे ठरविले आहे. त्यामुळे टिळेकर व मोरे या दोघांतील वाद थांबण्याची लगेच शक्यता दिसत नाही. भेट स्वीकारून टिळेकर यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला असून, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

 
हिल टाॅप व हिल स्लोपचे आरक्षण बदलून संबंधित व्यावासायिकाचा तब्बल ५० कोटी रूपयांचा फायदा टिळेकर यांनी करून दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच प्राप्तिकर व इतर करांचा भरणा करावा लागू नये यासाठी ही गाडी संबंधित व्यावसायिकाच्या नावावर आहे. मात्र तिचा वापर हे टिळेकर करत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. मनसेचे दुसरे नगरसेवक साईनाथ बाबर यांची तक्रार अर्जावर स्वाक्षरी आहे. 

टिळेकर यांनी हे आरोप वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. तसेच मित्राची गाडी वापरायला घेतली तर काय चुकले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मोरे हे व्यक्तिद्वेषातून आरोप करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांना दहा कोटी रूपयांची नोटीस पाठविल्याचे त्यांनी नमूद केले.

संबंधित लेख