complaint against amit shah in dondaicha | Sarkarnama

अमित शाह यांना दोंडाईचाला यावे लागणार?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनी सकाळी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरूध्द दोंडाईचा न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे. 

धुळे : नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनी सकाळी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरूध्द दोंडाईचा न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे. 

दोंडाईचा येथील स्वाभिमानी विचार मंचचे अध्यक्ष ऍड. एकनाथ भावसार यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. 

स्वातंत्र्य दिनी, पंधरा ऑगस्टला सकाळी भाजपच्या नवी दिल्लीतील कार्यालयस्थळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी ध्वजरोहणासाठी दोरी ओढली. मात्र, पुरेशी काळजी न घेतली गेल्याने ध्वज खाली पडला. त्यांनी ध्वजाचा आदर व सन्मान राखत, त्याला नमन न करता लागलीच दुसरी दोरी ओढत ध्वजरोहणाचा प्रयत्न केला. नंतर ध्वजवंदन केले. श्री. शहा यांना राष्ट्रध्वजाविषयी कायदा, काळजी व आनुषंगिक माहितीची चांगली जाण आहे. तरीही त्यांनी ज्या पद्‌धतीने ध्वजारोहणाचा प्रयत्न केला. तो अवमान करणारा होता. तशी माहिती व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याआधारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याविरूध्द फिर्याद देत असून चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ऍड. भावसार यांनी न्यायालयाकडे केली. 
त्यांच्यातर्फे ऍड. आर. आय. राजपूत, ऍड. डी. व्ही. पाटील, ऍड. पी. एस. मराठे, ऍड. ए. डी. पाटील, ऍड. तुषार इशी, ऍड. संतोष भोई, ऍड. एस. ए. माणिक, ऍड. जे. जे. वाघेला, ऍड. अरूण माळी, ऍड. एम. जे. शाह कामकाज पाहत आहेत. 

संबंधित लेख