compine election impossible | Sarkarnama

एकत्रित निवडणुका घेणे अशक्‍य, मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली ः घटनात्मक बाबींची पूर्तता केल्याशिवाय एकत्रित निवडणुका घेणे अशक्‍य असल्याचे स्पष्टिकरण मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज दिले. 

अशा प्रकारे निवडणुका घेण्यासाठी काही विधानसभांची मुदत वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची आवश्‍यकता असल्याचेही रावत यांनी स्पष्ट केले. घटनात्मक बाबींची पूर्तता करण्याची गरज असल्याचे सांगत रावत यांनी एकप्रकारे नजिकच्या काळात एकत्रित निवडणुका घेणे शक्‍य नाही, असाच सूर लावला आहे. 

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याची मागणी करणारे पत्र भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला नुकतेच लिहिले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना रावत म्हणाले की, देशातील काही विधानसभांची मुदत कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे घटनात्मक बाबींच्या पूर्ततेनंतरच एकत्रित निवडणुका घेणे शक्‍य होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख