Come with Maratha Caste Certificate in Agitation Says Nashik EX MLA | Sarkarnama

यापुढे मराठा जातीचा दाखला घेऊनच आंदोलनात यावे : भाजप नेते माणिकराव कोकाटे 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सकल मराठा समाजातर्फे शहरात ठिय्या आंदोलन झाले. त्यात व्यासपीठावर राजकीय नेते होते. यावेळी एक युवक भाषण करीत होता. त्याने सत्ताधारी भाजपविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्याला कोकाटे यांनी हरकत घेतली. तेव्हा गोंधळ झाला. या युवकाने कोकाटे यांच्या दिशेने काहीतरी भिरकावले.

नाशिक : ''आज झालेल्या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावर गोंधळ झाला. त्यात माझ्या दिशेने दगड भिरकावण्यात आला. यामध्ये बहुदा समाजकंटक असावेत. त्यामुळे उद्यापासून आंदोलनात सहभागी व्हायचे असल्यास आपण मराठा जातीचे आहोत, हा दाखला घेऊनच आंदोलनात सहभागी व्हावे. इतरांना घुसता येणार नाही," असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.

सकल मराठा समाजातर्फे शहरात ठिय्या आंदोलन झाले. त्यात व्यासपीठावर राजकीय नेते होते. यावेळी एक युवक भाषण करीत होता. त्याने सत्ताधारी भाजपविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्याला कोकाटे यांनी हरकत घेतली. तेव्हा गोंधळ झाला. या युवकाने कोकाटे यांच्या दिशेने काहीतरी भिरकावले.

मात्र मला मारहाण झालेली नाही. मी व्यासपीठावरुन निघुन गेलो, असे सांगत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ''त्या युवकाला पोलिसांनी पकडले आहे. तो कोण आहे हे माहीत नाही. मात्र, तो बहुदा समाज कंटक असावा. आजवर कधीही आंदोलनात न दिसलेले काही बाहेरचे लोक आज सहभागी झाले होते. त्यांनी गोंधळ घातला. त्यांनीच दगडफेक व जबरदस्तीने बंद घडवला." कोकाटे यांनी यावेळी राज्य सरकारचे समर्थन केले. सरकार जनतेचे मायबाप असते ते कोणत्याही जाती धर्माचे नसते. ते सगळ्यांसाठी काम करते, असे ते म्हणाले. 
 
संबंधित लेख