collector shweta singhal about sandmafia | Sarkarnama

वाळूमाफियांकडून झालेला हल्ला प्रशासनावरचा; प्रवृत्ती मोडून काढणार : सिंघल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

तळबीड येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांनी भ्याड हल्ला केला. तो प्रशासनावर हल्ला आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचाही गुन्हा आहे. त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

कऱ्हाड : तळबीड येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांनी भ्याड हल्ला केला. तो प्रशासनावर हल्ला आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचाही गुन्हा आहे. त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

या वेळी महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, प्रांताधिकारी हिंमत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते. 

श्रीमती सिंघल म्हणाल्या, ""राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा आढावा शुक्रवारी घेतला. योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभाग, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व महसूल विभागांची संयुक्तिक सूचना केल्या आहेत. राज्य शासनाच्या योजनांचा फायदा तळागाळातील लोकांना झाला पाहिजे. यासाठी योजनांच्या जनजागृतीसह विविध शैक्षणिक संस्थामंध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत, असेही सूचित केले. यापूर्वीच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांऐवजी संस्था घेत होत्या. मात्र, आता शासनाने त्यात पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे आता शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. 
 

संबंधित लेख