collector hingoli | Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांनी झापले तूर खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

हिंगोली : जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी अचानक शुक्रवारी नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर भेट दिल्यानंतर तेथील खरेदी प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त केली. तसेच वेळेवर खरेदी पूर्ण करा, अशी तंबीही दिली. येथील शासकीय तूर खरेदी केंद्र मोंढ्यात सुरू करण्यात आले. सरकारने 8 दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर प्रत्यक्षात नाफेडने दोन दिवस तुरीची खरेदी केली. त्यातही केलेल्या खरेदीचा माल तसाच पडून राहिला. नाफेडने फक्त सहा हजार क्‍विंटलची नोंदणी घेतली.

उर्वरित माल नोंदणीकृत नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे माल आणून टाकणारे शेतकरी अडचणीत सापडले. नाफेडच्या संथगती कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी अचानक तूर खरेदी केंद्राला भेट दिली. तेव्हा भरमसाठ माल पडलेला असताना केवळ एकच चाळणी लावलेली होती. प्रत्यक्षात एवढा माल असताना दहा ते पंधरा चाळण्या का लावल्या जात नाही, असा सवाल जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी केला. तुरीचे मोजमाप का होत नाही याही प्रश्नाचे उत्तर नाफेडच्या अधिकाऱ्यांकडे नव्हते. बाजार समितीमध्ये भरमसाठ काटे व चाळण्या असताना तुरीचे मोजमाप करायला वेळ पुरत नाही का असे श्री. भंडारी यांचे म्हणणे होते. 

दुसरीकडे हजारो क्‍विंटल हळदीचे मोजमाप एकाच दिवसात संपत असताना तुरीच्या मोजमापाबाबत हलगर्जीपणा का सुरू आहे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. हमाल नसतील तर पुरवठा खात्याचे हमाल घेऊन जा असे भंडारी यांनी सुनावले. कोणत्याही परिस्थितीत तुरीचे मोजमाप संपले पाहिजे. आपण काही तासांनीच पुन्हा पाहणी करायला येऊ, अशी तंबी श्री. भंडारी यांनी दिली. या प्रकारामुळे नाफेड व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. 

संबंधित लेख