collector fines for bouquet in plastic cover | Sarkarnama

प्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ खासदाराला : कलेक्टर जी. श्रीकांत यांनी आकारला पाच हजारांचा दंड

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 25 जून 2018

लातूर : शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पुष्पगुच्छ (बुके) दिल्याबद्दल येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आहे.

प्लॅस्टिकबंदीनंतर एखाद्या शासकीय यंत्रणेला दंड आकारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी. लातूर जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज येथे झाली. त्या वेळी हा प्रकार घडला.

राज्यात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ठिकठिकाणी प्रबोधन करून प्लॅस्टिक जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असताना शासकीय यंत्रणेकडून प्लॅस्टिकबंदीच्या नियमाचे पालन करणे अपेक्षित होते; पण या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळेले पुष्पगुच्छ देऊन खासदार डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांचे स्वागत केले.

हे स्वागत सुरू असताना जी. श्रीकांत यांचे प्लॅस्टिककडे लक्ष गेले. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचे आदेश दिले. ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या दंड वसुलीचे अधिकार आहेत. त्यामुळे या साखळीतील कोणताही अधिकारी दंडाची आकारणी करू शकतो. एकाद्या जिल्हाधिकाऱ्याने थेट दंडवसुली केल्याची ही पहिलीच घटना असावी.

संबंधित लेख