cogress win in karnataka | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

कर्नाटकात कॉंग्रेसचा वरचष्मा, भाजपची पीछेहाट  

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

बंगळूर : राज्यातील तीन महापालिकांसह 105 शहर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. राज्यातील पालिकांत सत्ता स्थापन करण्यात कॉंग्रेस व भाजपात अटीतटीची लढत झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकूण सदस्यांपैकी सर्वाधिक 982 जागा जिंकून कॉंग्रेसने वरचष्मा कायम ठेवला. 

बंगळूर : राज्यातील तीन महापालिकांसह 105 शहर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. राज्यातील पालिकांत सत्ता स्थापन करण्यात कॉंग्रेस व भाजपात अटीतटीची लढत झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकूण सदस्यांपैकी सर्वाधिक 982 जागा जिंकून कॉंग्रेसने वरचष्मा कायम ठेवला. 

कॉंग्रेसला 33 पालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळविता आले. भाजपला 32 तर धर्मनिरपेक्ष जनता दलला (धजद) केवळ 12 पालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. 28 ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. राज्यातील 3 महापालिका, 29 नगरपालिका, 53 नगर परिषदा व 20 नगर पंचायतीसाठी 31 मार्चला मतदान झाले होते. एकूण 2264 प्रभागांपैकी 2661 प्रभागांत निवडणूक घेण्यात आली. त्यापैकी 982 जागांवर कॉंग्रेस, 929 जागांवर भाजप व 375 जागांवर धजदचे उमेदवार विजयी झाले. 375 जागांवर अपक्षांनी विजय मिळविला. 

29 नगरपालिकांपैकी भाजपचे सर्वाधिक दहा, कॉंग्रेसने 7 तर धजदने 2 ठिकाणी विजय मिळविला. दहा नगरपालिकांमध्ये त्रिशंकू अवस्था आहे. राज्यातील 53 नगर परिषदांपैकी 19 ठिकाणी कॉंग्रेस, 14 ठिकाणी भाजप आणि 8 ठिकाणी धजदला बहुमत आहे. अन्य 12 नगरपरिषदांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. 20 नगरपंचायतींपैकी कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 7 ठिकाणी तर धजदला केवळ दोन ठिकाणी बहुमत मिळवता आले. 

4 नगरपंचायती त्रिशंकू अवस्थेत आहेत. 
राज्यातील तुमकूर महापालिकेत कॉंग्रेस आणि धजद आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. तर शिमोगा महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. म्हैसूर महापालिकेतही कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. मात्र, या ठिकाणीही कॉंग्रेस-धजद आघाडी सत्ता मिळवण्याची स्थिती आहे. 

निकालाची स्थिती (एकूण सदस्यसंख्या 2661) 
कॉंग्रेस : 982 
भाजप : 929 
धजद : 375 
अपक्ष : 375 
 

संबंधित लेख