cobler communitys demond will fulfil devendra fadnavis | Sarkarnama

चर्मकार समाजासाठी स्वतंत्र आयोग, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

मुंबई : राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि रोहिदास पंचायत संघ, मुंबई यांच्या वतीने परळ येथे उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभाप्रसंगी काल फडणवीस बोलत होते. 

फडणवीस म्हणाले, "" देशात संत रोहिदास यांनी समतेची परंपरा सुरु केली. त्याच माध्यमातून समाज एकत्र केला. त्यांच्या विचारातूनच "सबका साथ सबका विकास' ही संकल्पना तयार झाली आहे. समताधिष्ठीत राज्याचा त्यांचा विचार होता. त्याच विचारावर शासन काम करीत आहे. संत रोहिदास यांच्या कार्याला आणि विचाराला समर्पित तसेच देशाला अभिमान वाटेल असे संत रोहिदास भवन येथे उभारण्यात येईल. समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही.'' 

सामाजिक न्याय  मंत्री बडोले म्हणाले, मुंबईत उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनच्या धर्तीवरच राज्यात प्रत्येक विभागात संत रोहिदास भवन उभारणार आहे. या भवनमध्ये विद्यार्थ्यांना वसतीगृह, ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. 

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, सुधाकर भालेराव, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल अंबेकर, रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबईचे अध्यक्ष मयुर देवळेकर आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख