coal shortage loadsheding devendra fadanvice | Sarkarnama

कमी वसुली आणि कोळशाच्या कमतरेतमुळे लोडशेडिंग : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : तीस टक्‍यापेक्षा कमी घरगुती व शेती वीजबीलाची वसुली आणि कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात लोडशेडिंग सुरू आहे. पण दुष्काळामुळे लोडशेडिंग थांबवण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

ऐन सणासुदीच्या दिवसात वीज भारनियम सुरू करण्यात आले, या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, की ज्या भागातील वीज वसुली तीस टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. त्या भागात एमईआरसीच्या आदेशानूसार भारनियमन केले जात आहे. पण दुष्काळामुळे भारनियमन करू नये अशा सूचना आपण केल्या आहेत. 

लोडशेंडिगचे दुसरे कारण कोळशाची कमतरता हे असले तरी असा प्रसंग दरवर्षी येतच असतो. पावसामुळे कोळशाची निर्मीती कमी होते. परंतु केंद्र शासनाने इम्पोंर्टेड कोळशाचा कोटा वाढवून दिला आहे, त्यामुळे आम्ही नियोजन करत आहोत असेही ते म्हणाले. 

पाण्याआभावी काही सबस्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. शिवाय खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्याची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणीही आम्ही एमईआरसीकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पावसाळा आता जवळपास संपला आहे, थोडीफार परतीच्या पावसाची आशा असली तरी तो पडेलच याची शाश्‍वती नसल्यामुळे कोयना आणि इतर काही प्रकल्पातील पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याचे आपण सध्या थांबवले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख