co operative officer faces teacher"s wrath | Sarkarnama

सहकार उपनिबंधकांना शिक्षकांचा घेराव 

संपत देवगिरे - सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सप्टेबर, 2016 पासून   जिल्हा बॅंकेत पगार खाते असलेल्या अठरा हजार शिक्षक कर्मचा-यांना बॅंकेकडून अनुदान अदा झाल्यावरही पुर्ण वेतन मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांचे पैसे अदा करण्याच्या सूचना द्याव्यात या मागणीसाठी आज शिक्षकांनी सहकार उपनिबंधकांना निवेदन देऊन रास्ता रोको केला. 

नाशिक: केंद्र शासनाने नोटबंदी जाहीर केल्यापासून सप्टेबर, 2016 पासून   जिल्हा बॅंकेत पगार खाते असलेल्या अठरा हजार शिक्षक कर्मचा-यांना बॅंकेकडून अनुदान अदा झाल्यावरही पुर्ण वेतन मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांचे पैसे अदा करण्याच्या सूचना द्याव्यात या मागणीसाठी आज शिक्षकांनी सहकार उपनिबंधकांना निवेदन देऊन रास्ता रोको केला. 

जुना मुंबई आग्रा महामागार्वर सहकार उपनिबंधकांचे कायार्गलय असलेल्या गडकरी चौकात शिक्षक तसेच महिलांनी अचानक केलेल्या या रास्ता रोको आंदोलनाने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी हस्बातक्षेप करुन वाहतुक सुरळीत केली. 

गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांनी या प्रश्र्नासाठी सातत्याने आंदोलन केले आहे. त्यासाठी विविध शाखांना टाळे ठोकले होते. त्यानंतर बॅंकेच्या मुख्यालयात जाऊनही आंदोलन केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन दिल्याने त्यांनी बॅंकेच्या अधिका-यांना कायार्लयात बोलावून सूचना दिल्या होत्या.

इतरांना दिलेले धनादेश वटत नाहीत. मात्र शासनाकडून सहकार्य नसल्याने व बंकेची वसुली ठप्प झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यात पोषण आहाराचा निधी तेसच शिक्षकांचे वेतन अडकले आहे. सध्या तर केवळ दोन हजार रुपयेच मिळत असल्याने गंभीर पेच निर्माण झाला आहे.

यासंदर्भात शिक्षक लोकशाही आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आर. डी. निकम, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष फिरोज बादशहा, समन्वय समितीचे प्रमुख साहेबराव कुटे यांसह विविध पदाधिका-यांनी सहकार उपनिबंधकांना निवेदन देऊन चर्चा केली.    

संबंधित लेख