चोरी नाही, दरोडा नाही; केवळ मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न हाच गुन्हा ठरला : एकनाथ खडसे

मी चोरी केली नाही, दरोडा टाकला नाही,कोणताही गुन्हा केला नाही. केवळ मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघितले आणि हाच माझा गुन्हा ठरला असून त्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे, अशी खंत मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
चोरी नाही, दरोडा नाही; केवळ मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न हाच गुन्हा ठरला : एकनाथ खडसे

जळगाव : मी चोरी केली नाही, दरोडा टाकला नाही,कोणताही गुन्हा केला नाही. केवळ मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघितले आणि हाच माझा गुन्हा ठरला असून त्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे, अशी खंत मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

सावदा(ता.रावेर) येथे मुस्लीम समाजातर्फे आयोजित 'एक शाम नाथाभाऊ के नाम' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, "चाळीस वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्री पदावर असतांना मी जाती-धर्माच्या आधारावर कधीच काम केले नाही. मुस्लीम समाज मागास असल्याने त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला. मंत्रीपदावर असतांना राज्यात काही जणांच्या ताब्यात असलेल्या वक्‍फ बोर्डाच्या महागड्या जमिनी शासनाच्या ताब्यात घेण्याची कारवाई मी सुरू केली होती. त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती. परंतु, ही कारवाई आमच्याकडील काही लोकांना आवडली नाही.केवळ सामाजिक भावनेतून मी ही कारवाई केली होती."

यावेळी मंत्रीपदाबाबत बोलतांना ते म्हणाले, "मंत्रिपद येतात आणि जातात.गेल्या चाळीस वर्षाच्या काळात मी अनेक मंत्रीपदे भूषविली आहेत.याच वेळी एका कार्यकर्त्याने पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. यावर बोलतांना मी 'मुख्यमंत्रीही होऊ', असे म्हटले होते. मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे. हाच माझा गुन्हा ठरला आहे. अन्यथा मी कुठेही चोरी केली नाही, कुठेही दरोडा टाकला नाही कोणताही गुन्हा केलेला नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com