cm`s no comeent on narayan rane | Sarkarnama

राणेंना राज्यसभा? मुख्यमंत्री म्हणतात यादी जाहीर होईपर्यंत वाट पाहा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना नक्की कोणत्या पदावर संधी द्यावी, याबाबत भाजपचा घोळ अजून संपलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी "राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर आपणास हे समजेल' असे विधान केले. त्यामुळे या प्रश्नाबाबत अद्याप चर्चा सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

खुद्द राणे हे राज्यसभेवर जाण्यास फारसे इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. राणे यांची गरज महाराष्ट्रात असल्याचे त्यांच्या पुत्रांनी स्पष्ट केले आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर यांची नावे राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून निश्चित झाल्याचे बोलण्यात येते. तिसऱ्या जागेसाठी राणे यांच्या नावाचा विचार केला जात आहे. मात्र खुद्द राणे यांनी मंत्रिपदातच रस आहे. मात्र भाजप श्रेष्ठी त्यावर त्यांना स्पष्ट बोलण्यास नकार नसल्याने त्यांचीही कोंडी झाली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपापली नावे निश्चित केली आहेत. काॅंग्रेसने अद्याप आपले नाव राज्यसभेसाठी जाहीर केलेले नाही. त्यामुळे या नावाबद्दलही उत्सुकता आहे. आता भाजपच्या यादीत राणेंचे नाव असणार की नाही, यावरही अजुन अनिश्चितता आहे. 

संबंधित लेख