cm`s felicitation in Shirur : Pacharne | Sarkarnama

मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांचा शिरूरमध्ये होणार सत्कार : पाचर्णे

भरत पचंगे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

शिक्रापूर : प्रलंबित राहिलेल्या मराठा आरक्षणाला मोठ्या ताकदीने न्याय देणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिरुरमध्ये आणून जाहीर सत्कार करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केली.

शिक्रापूर : प्रलंबित राहिलेल्या मराठा आरक्षणाला मोठ्या ताकदीने न्याय देणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिरुरमध्ये आणून जाहीर सत्कार करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केली.

विधिमंडळात आज झालेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत बोलताना आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाबाबतीतल्या प्रत्येक बैठकीतील चर्चेची माहिती आम्हा सर्व भाजपा-शिवसेना आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गिरीश बापट आदी नेतेमंडळी देत होते आणि आमची मतेही जाणून घेत होते. संपूर्ण राज्यच नव्हे तर देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेण्यासाठी फडणवीस यांनी दाखविलेली परिपक्वता ही सकल मराठा समाजासाठीही कौतुकास्पद आहे. याच त्यांच्या कर्तबगारीबद्दल आपण लवकरच शिरुरमध्ये त्यांना जाहिर सन्मानित करणार अाहोत.

पाककमंत्री गिरीश बापट यांनी आमदार आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या वाजेवाडी (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी आज संध्याकाळी जोरदार फटाके वाजवून फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. तसेच पालकमंत्री गिरीश बापट व आमदार पाचर्णे यांचेही अभिनंदन यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच अमित सोनवणे यांनी केले.

संबंधित लेख