cm will change nawab malik | Sarkarnama

राज्यात बदलाचे वारे : नवाब मलिक 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई : देशासह राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता बदल करण्याच्या विचारात असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सांगली आणि जळगाव महानगरपालिकेचे निकाल उद्या (ता. 3) लागणार असून सांगली महापालिकेमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला बहुमत मिळेल, असा आशावाद मलिक यांनी व्यक्त केला.

राज्यातील एकंदरीत वातावरण पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली आणि जळगाव या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला उपस्थित राहू शकले नाहीत. याचाच अर्थ जनतेमध्ये रोष आहे हे त्यांना माहीत आहे, असा टोला लगावत सध्या राज्यात परिस्थिती बदलत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता बदल करण्याच्या विचारात आहेत आणि तसेच निकाल लागतील, असेही मलिक म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख