CM in Vidharbha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे शेतकऱ्याची आत्महत्या बेदखल ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूळगावी मूल (जि. चंद्रपूर) येथे त्यांचा कार्यक्रम सुरू असताना तेथून जवळच्या भादुर्णी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला चार तास लटकत होता. परंतु पोलिस मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने कुणीही दखल घेतली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूळगावी मूल (जि. चंद्रपूर) येथे त्यांचा कार्यक्रम सुरू असताना तेथून जवळच्या भादुर्णी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला चार तास लटकत होता. परंतु पोलिस मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने कुणीही दखल घेतली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

माजी मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मूल येथे मंगळवारी झाले. त्याच वेळी तेथून केवळ 10 किलोमीटर असलेल्या भादुर्णी येथील शेतकरी उमेद चहाकाटे यांनी जिल्हा परिषद शाळेमागे असलेल्या झाडाला सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या संदर्भात सकाळी 10 वाजताच्या सुमारास नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. परंतु पोलिस मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचे कारण देऊन तब्बल चार तास त्या गावात दाखल झाले नाही. जवळपास चार तास हा शेतकऱ्याचा मृतदेह तसाच झाडाला लटकत होता. मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी मूल येथील सारे पोलिस व्यस्त होते. त्यामुळे पोलिसांना वेळ न मिळाल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

संबंधित लेख