फडणविसांकडे केरळ तर; शेलारांकडे कर्नाटकातील भाजपची "अवघड' जबाबदारी 

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. पक्षाला जिंकण्यासाठी अवघड असलेले लोकसभा मतदारसंघ हेरून ठेवण्यात आले आहेत. या मतदारसंघांची जबाबदारी पक्षातील मोठ्या नेत्यावर देण्यात आली आहे. या टिममध्ये राज्यातील तीन नेत्यांना प्रमुख कामगिरी बजवावी लागणार आहे.
फडणविसांकडे केरळ तर; शेलारांकडे कर्नाटकातील भाजपची "अवघड' जबाबदारी 

मुंबई : भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत बैठकीचे सत्र सुरू ठेवले आहे. भाजपसाठी कमकुवत असलेल्या देशभरातील 135 जागांवर पुढील निवडणुकील लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

पक्षाला २०१४ च्या निवडणुकीत २८२ जागांवर विजय मिळाला होता. या सर्वच जागांवर २०१९ ्च्या निवडणुकीत यश मिळेलच, असे नाही. त्यामुळे ज्या जागांवर पक्षाला कधीच विजय मिळाला नव्हता, अशा १३५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पक्षाने मिशन ३५० प्लस हाती घेतले आहे. त्याचाच हा भाग म्हणून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

या 135 जागांवर विजय मिळविण्यासाठी क्‍लस्टर योजना तयार केली आहे. असे 27 क्‍लस्टर ग्रुप असून त्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी महत्वाच्या नेत्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रातून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश.  

टीमच्या प्रमुखाकडे 5 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे गुरुवारी दिल्लीला गेले होते त्यांची अमित शाह यांची भेट झाली. शेलार यांच्याकडे कर्नाटक राज्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. कर्नाटकात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे शेलार हे आतापासूनच कर्नाटकच्या तयारीवर लक्ष ठेवून असतील, असे सांगण्यात आले. 

कम्युनिस्ट पक्षाचे प्रस्थ असलेल्या केरळ राज्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या राज्यात भाजपला आतापर्यंत एकाही जागेवर यश मिळालेले नाही. ते मिळवून देण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आंध्र प्रदेशमधील क्‍लस्टर टिमची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 21 ऑगस्ट रोजी बैठकीला बोलविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com