CM should apologies maratha samaj | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी : संभाजी ब्रिगेड

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यांबद्दल बिनशर्त माफी मागावी, त्यांना मिळालेल्या गुप्त अहवालाचा खुलासा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने ऍड मनोज आखरे यांनी केली आहे.
 
मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही प्रत्येक वेळी सरकारने केवळ आश्वासने दिली आहेत. कोणतीही मागणी आतापर्यंत पुर्ण केली नाही. याउलट वारकऱ्यांमध्ये समाजाबद्दल मने कलुषित करण्याचे काम करण्यात येत आहे. मराठा समाज संतांच्या परंपरेची शिकवण असलेला आहे. यामुळे वारकऱ्यांच्या बाबतीत कोणताही चुकीचं विचार करणार नाही, असे आखरे यावेळी म्हणाले. याउलट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनीच कोल्हापूरहून पाचशे मुले दंगल घडविण्यासाठी पंढरपूर येथे पाठवली असल्याचा आरोपही यावेळी आखरे यांनी केला आहे.
 
यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी. अन्यथा काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 304 आणि 306 अन्वये पुन्हा दाखल करण्यात यावा. यावेळी संघटनेचे संतोष शिंदे, संतोष गाजरे उपस्थित होते. 

संबंधित लेख