मंदा म्हात्रे यांच्या अहवालात आणखी 50 पाने जोडावी लागणार  : फडणवीस 

म्हात्रे यांच्या कार्यअहवालात आणखिन 50 पाने जोडावी लागणार असल्याचे सांगत विधानसभेत पुन्हा म्हात्रे यांना उमेदवारी देणार असे अप्रत्यक्ष संकेत फडणवीस यांनी दिले.
manda-mhatre-cm
manda-mhatre-cm

नवी मुंबई : लोकप्रतिनिधी हे लोकांना उत्तर देण्यासाठी बांधिल असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपण निवडून आल्यानंतर केलेल्या कामांचा जनतेला हिशेब मागण्याचा अधिकार आहे. कार्यअहवाल प्रकाशित केलाच पाहिजे अशी परंपरा भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ म्हाळगी यांनी भाजपमध्ये सुरू केली होती. म्हात्रे यांनी कार्यअहवाल प्रकाशित करून तिच परंपरा जपली असल्याचे गौरवोद्गार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

तसेच म्हात्रे यांच्या कार्यअहवालात आणखिन 50 पाने जोडावी लागणार असल्याचे सांगत विधानसभेत पुन्हा म्हात्रे यांना उमेदवारी देणार असे अप्रत्यक्ष संकेत फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांच्या विधानामुळे बेलापूर विधानसभेचे स्वप्न पाहणाऱ्यांचे हे स्वप्नच ठरते की काय अशी चर्चा रंगली आहे.

गावठाणातील गरजेपोटी घरांचा निर्णय, फ्री होल्ड, अडीच एफएसआय, कूकशेत गावाचे पूर्नवसन, माफ केलेली मुद्रांक शुल्क असे अनेक न सुटलेले निर्णय फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मकतेमुळे सुटले असे मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले. तसेच नवी मुंबईतील गावठाण विस्तार, मालमत्ता कार्ड आदी विषय सोडवण्याबाबत मागणी म्हात्रे यांनी भाषणात केली. 

" म्हात्रे यांनी अहोरात्र आपल्यापाठीमागे लागून केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईचे प्रश्‍न सुटले असे सांगून फडणवीस यांनी सर्व श्रेय म्हात्रे यांना दिले. तसेच पूढील वर्षे आपलीच असून कार्यअहवालाला आणखिन 50 पाने जोडावी लागतील असे मुख्यमंत्री म्हणाले .  कार्यअहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने नेरूळ येथील गणपत शेट तांडेल मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगितकार शंकर महादेवन यांनी गाजलेली गिते सादर केली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अप्सरा आली, वाजले की बारा या गाण्यावर थिरकून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अभिनेता सुबोध भावे याने आपल्या निवेदनामुळे उपस्थिकांचे लक्ष वेधून घेतले. 

या प्रसंगी वाशी खाडीत पूलावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना वाचवणारा मच्छिमार महेश सुतार याचे फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.  मंचावरील राजकीय कार्यक्रम संपल्यानंतर फडणवीस बराच वेळ उपस्थितांमध्ये बसून कार्यक्रम पाहिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com