परभणीच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री सकारात्मक :  डॉ. राहुल पाटील 

Parbhani-cm
Parbhani-cm

परभणी  : परभणी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्यात यावे, यासाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी परभणी जिल्हा हा वैद्यकीय  महाविद्यालयासाठी पूर्णपणे सक्षम असून जिल्हा पात्र असतांना ही डावलल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिकात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. 

त्यामुळे परभणीत महाविद्यालय होण्याची ठोस अपेक्षा निर्माण झाली आहे, अशी माहिती आमदार डॉ.पाटील यांनी पत्रकारांना दिली.

 या शिष्टमंडळात आमदार बाबजानी दुराणी, आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी सभापती गणेशराव रोकडे आदींचा समावेश होता.

गेल्या अनेक वर्षांपासून परभणीत वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होत आहे. या ठिकाणीच्या जिल्हा रुग्णालयात पाचशे वीसहुन अधिक खाटा असून, या ठिकाणी राज्यातील मोठी ओपीडी आहे. स्वतंत्र स्त्री रुग्णालय, स्वतंत्र नेत्र रुग्णालय आहे. प्रशासकीय कारभार चालवण्यासाठीची प्रशासकीय इमारत तयार आहे.

  आमदार पाटील यांनी सांगितले ,"  परभणीत महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या दोन्ही समितीने शासनाला सकारात्मक अहवाल सादर केलेला आहे. विशेष म्हणजे विकासाच्या बाबतीत मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूरच्या तुलनेत खूप मागे आहे. या मुळे सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे महाविद्यालय परभणीत झाले पाहिजे. यामुळे परभणीकरांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे, ही बाब देखील मुख्यमंत्र्यांना  आम्ही ठासून सांगितली ,"

" त्यामुळे तात्काळ महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 'या संदर्भात आपण संबंधितांना आदेश देऊ, त्यासाठी तुम्ही प्रस्ताव सादर करा', तसेच यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना भेटण्याची सूचना देखील केली, "अशी माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com