cm phadnis mumabai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शेतकरी कर्जमाफीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा हातभार

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्य सरकारने निधीची जुळवा जुळव सुरू केली आहे. कर्जमाफीच्या निधीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर करता यावा म्हणून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अकरावे उद्दिष्ट म्हणून शेतकरी कर्जमाफीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा हातभार लागणार आहे. 

राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, या कर्जमाफीसाठी सरकारला निधीची चणचण भासत असल्याने आर्थिक गणित जुळवण्याचे प्रयत्न युध्द पातळीवर सुरू आहेत. राज्यासह देशातील नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या संकटग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी " मुख्यमंत्री सहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली.

या निधीमध्ये आता कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर करता यावा म्हणून राज्य शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व त्यांचे कुटूंबिय यांनी घेतलेल्या शेती कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शासकिय योजनेला आर्थसहाय्य करणे असे अकरव्या उद्दिष्ट्याचा सामावेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीसाठी निधीची तरतुद करणे सोप्प जाणार आहे. 

संबंधित लेख