cm phadnavis | Sarkarnama

कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांविरोधात नगरमध्ये याचिका दाखल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप करीत नगरच्या न्यायालयात पुण्यातील कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी खासगी फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील सुनावणी उद्या (9 मे) होणार आहे, अशी माहिती ऍड. वाजेद खान (बिडकर) यांनी दिली. 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे मार्चमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी कर्जमाफी केल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील याची हमी काय, यानंतर शेतकरी कर्जमाफी देणार नाही, असे सांगितले होते. या वक्तव्यामुळे औरंगाबाद येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच राज्यातील 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

या आत्महत्येस मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल करावा, असे या खासगी याचिकेत म्हटले आहे. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्यासमोर ही फिर्याद दाखल झाली. पाटील यांच्या बाजूने ऍड. खान यांनी बाजू मांडली. नगर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नगरच्या न्यायालयात फिर्याद दिली असल्याचे ते म्हणाले. 

संबंधित लेख