Cm Phadanavis Replies to Ajit Pawar's Criticism | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अजित पवारांना तेवढंच काम उरलंय - मुख्यमंत्र्यांची टीका 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायेत, शेतकरी चिंतेत आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण लातूरात 2019 चा मुख्यमंत्री मीच हे सांगायला मात्र त्यांना वेळ आहे, ते अजूनही स्वप्नातच आहे का? अशी टीका अजित पवारांनी या मेळाव्यात बोलतांना केली होती.

औरंगाबाद : पुढचा मुख्यमंत्री मीच म्हणणारे देवेंद्र फडणवीस अजूनही स्वप्नातच आहेत का? असा खोचक सवाल विचारणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांनी 'अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय' अशा शब्दांत उत्तर दिले. 

औरंगाबादेत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. 10) शहरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीची माहिती दिली. मंगळवारी संविधान बचाव, देश बचाव या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. 

राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायेत, शेतकरी चिंतेत आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण लातूरात 2019 चा मुख्यमंत्री मीच हे सांगायला मात्र त्यांना वेळ आहे, ते अजूनही स्वप्नातच आहे का? अशी टीका अजित पवारांनी या मेळाव्यात बोलतांना केली होती. पत्रकार परिषदेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न केला असता 'अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय' असे म्हणत त्यांनी या टीकेचा समाचार घेतला.

संबंधित लेख