cm in panwel | Sarkarnama

विकासचा अजेंडा घेऊनच पनवेलमध्ये निवडणुकीला सामोरे जा - फडणवीस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई : पनवेल शहर हे एक स्मार्ट शहर बनवणे, हाच पनवेल महापालिकेला मंजुरी देण्याचा मूळ उद्देश होता. त्यामुळे हा उद्देश सफल करण्यासाठी या महापालिका निवडणुकीत विकास हा एकमेव अजेंडा घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. 

मुंबई : पनवेल शहर हे एक स्मार्ट शहर बनवणे, हाच पनवेल महापालिकेला मंजुरी देण्याचा मूळ उद्देश होता. त्यामुळे हा उद्देश सफल करण्यासाठी या महापालिका निवडणुकीत विकास हा एकमेव अजेंडा घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. 

मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पनवेल महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व उमेदवार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेतील नागरिकांच्या गरजा आणि सूचनांचा विचार करून, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या जाहीरनाम्याचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात जाहीरनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील मूळचे नागरिक आणि रोजगारानिमित्त बाहेरून या परिसरात वास्तव्यास आलेल्या रहिवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली पाहिजे.पंतप्रधानांच्या संकल्पनेतील "सबका साथ, सबका विकास' या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी झटले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

जनतेच्या स्वप्नातील पनवेल साकारण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी "आपलं शहर, आपला अजेंडा' या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. त्याला असंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांच्या या सूचना आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाच्या कल्पना या दोन बाबींच्या आधारे या जाहीरनाम्याची निर्मिती करण्यात आली आहे. 

संबंधित लेख