CM Nandurbar Tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

पोलिसांचा गनिमीकावा अन्‌ काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अटक! - मुख्यमंत्र्यांचा धुळे, नंदुरबारचा 'फास्ट' दौरा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

मुख्यमंत्र्यांनी नियोजित दौऱ्याप्रमाणे भगदरी, मोलगी (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथे विविध कामांची पाहणी केली. पालकमंत्री तथा पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, भाजपचे लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हा दौरा आटोपून शिंदखेडा येथे दुपारी तीनला धुळे जिल्ह्याची आढावा बैठक होती. मात्र, ती मुख्यमंत्र्यांनी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनीच सुरू केली. मोलगी येथून त्यांच्या दौऱ्याला 10 वाजून 10 मिनिटांनी सुरवात होणार होती. मात्र, नियोजनाच्या तीस ते चाळीस मिनिटे अगोदर मुख्यमंत्र्यांचा दौरा होत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली

धुळे - "तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देतो, त्यांची कार मात्र अडवू नका', अशी हमी पोलिसांनी दिल्याने त्यावर विश्‍वास ठेवत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर व समर्थक पोलिसांच्या वाहनात बसले. पण नंतर त्यांना अटक केल्याचे लक्षात आले. विविध मागण्यांसह शेती कर्जमाफी होत नसल्याने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांची मोटार अडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दरखेडा (ता. शिंदखेडा) शिवारात सनेर व समर्थकांना बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास अटक झाली.

पूर्वी गनिमिकावा करत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोटार अडविण्याचा यशस्वी प्रयत्न सनेर यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातही ते मुख्यमंत्र्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न करतील, अशी पोलिसांना शंका होती. शिवाय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास सनेर यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी दरखेडा शिवारात तळ ठोकला. साळवे (ता. शिंदखेडा) येथील विविध कामांच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांसह त्यांचा ताफा शिंदखेड्याकडे जात असताना दरखेडा शिवारात आंदोलनाच्या प्रयत्नातील सनेर, काँग्रेसचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष साहेबराव खरकार, पांडुरंग माळी, लोटन माळी, शरद पाटील, जितेंद्र राजपूत, किशोर पाटील, सुभाष देसले आदींना शिंदखेडा पोलिसांनी अटक केली. सनेर यांना संधी न देता पोलिसांनीच गनिमीकावा करत त्यांना ताब्यात घेतले. शेती कर्ज माफी, बुराई नदी बारमाही करणे, बंदस्थितीतील उपसा जलसिंचन योजना पुनरुज्जीवित करणे आदी मागण्यांसाठी सनेर व समर्थक आंदोलनाच्या तयारीत होते.

मुख्यमंत्र्यांचा 'फास्ट' दौरा

तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी नियोजित दौऱ्याप्रमाणे भगदरी, मोलगी (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथे विविध कामांची पाहणी केली. पालकमंत्री तथा पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, भाजपचे लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हा दौरा आटोपून शिंदखेडा येथे दुपारी तीनला धुळे जिल्ह्याची आढावा बैठक होती. मात्र, ती मुख्यमंत्र्यांनी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनीच सुरू केली. मोलगी येथून त्यांच्या दौऱ्याला 10 वाजून 10 मिनिटांनी सुरवात होणार होती. मात्र, नियोजनाच्या तीस ते चाळीस मिनिटे अगोदर मुख्यमंत्र्यांचा दौरा होत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली

नंदुरबारला काय म्हणाले?

मोलगी येथील नंदुरबार जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, ''स्वातंत्र्यानंतरही विद्युतीकरणापासून वंचित असलेली नंदुरबार जिल्ह्यातील महसुली खेडी मार्च 2018 पर्यत विद्युतीकरण करू. यासाठी मध्य प्रदेशकडून विजेची खरेदी केली जाईल. नंदुरबारमधील कुपोषण आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन रिक्तपदांची भरती तत्काळ करून डॉक्‍टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी दुर्गम भागात राहण्याची 'मॉडेल' व्यवस्था केली जाईल. आदिवासींच्या आमचूर उद्योगावर प्रक्रिया आणि ब्रॅंन्डींगसाठी निधी देऊ. जिल्ह्यातील सोलर पंप योजनेच्या वाढीव उद्दीष्ट्याला मंजुरी दिली जाईल. पात्र अर्जांप्रमाणे शेततळ्यांचा लाभ देऊ.''

मुख्यमंत्र्यांनी सातपुड्यातील अतिदुर्गम भगदरी गावाला भेट दिली. बांधावर आणि आदिवासी शेतकऱ्यांशी त्यांच्या घरात जात संवाद साधला आणि चहापाणी केले. दौऱ्यात नियोजनाप्रमाणे स्वच्छता अभियानातील शौचालये, घरकुले, जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'जलयुक्त'वरील टीकेवर बोलणे मात्र टाळले.

संबंधित लेख