CM Nagpur | Sarkarnama

कर्जमाफीची संदिग्धता कायम 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल निश्‍चित घोषणा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टाळले. "योग्यवेळी' कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले.

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल निश्‍चित घोषणा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टाळले. "योग्यवेळी' कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळगाव मूल (जि. चंद्रपूर) येथे भेट दिली. माजी मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रपूर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, आमदार मितेश भांगडिया आदी उपस्थित होते. 

विरोधी पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, यासाठी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. विधानसभेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 आमदारांना निलंबित केल्यामुळे विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निश्‍चित काही घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी अपेक्षा जमलेल्या शेतकऱ्यांना होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल संदिग्धता कायम ठेवली. "योग्यवेळी' कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. यामुळे या वेळी जमलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली. 

संबंधित लेख