cm met ill davave | Sarkarnama

  आजारी दानवेंची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट   

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

औरंगाबाद: उन्ह लागल्यामूळे आणि थ्रोट इन्फेकशनमूळे आजारी पडलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी सोमवारी भेट घेत विचारपूस केली. 

वीस मिनिटे मुख्यमंत्री व दानवे यांच्या चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. 

औरंगाबाद: उन्ह लागल्यामूळे आणि थ्रोट इन्फेकशनमूळे आजारी पडलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी सोमवारी भेट घेत विचारपूस केली. 

वीस मिनिटे मुख्यमंत्री व दानवे यांच्या चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. 

प्रचाराच्या धामधुमीत वाढत्या उन्हाचा फटका बसल्यामूळे गेल्या सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शहानुरमिया दर्गा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर तीन ते चार दिवस विश्रांती घेऊन दानवे पुन्हा प्रचाराला लागले होते. मात्र शनिवारी त्यांना थ्रोट इन्फेकशनचा त्रास होऊ लागल्यामूळे त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉक्‍टरांनी त्यांना सक्‍तीची विश्रांती सांगितली आहे. यामूळे औसा (लातूर) व नगर येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला दानवे उपस्थित राहू शकले नाही. 

शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी  फडणवीस आणि हुसैन यांची औरंगाबाद पुर्व विधानसभा मदतदार संघातील गजानन महाराज मंदीर चौकात जाहिर सभा झाली. या सभेनंतर रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्री व हुसैन काही पदाधिकाऱ्यांसह आजारी दानवे यांच्या भेटीला गेले. 

गेल्या मंगळवारी रावसाहेब दानवे आजारी असल्याचे कळल्यानंतर कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनीही भेट घेत चर्चा केली होती. यावेळी जालना- आणि औरंगाबद लोकसभा मतदारसंघा विषयी दानवे-सत्तार यांची चर्चा झाली होती. त्याच प्रमाणे आजही मुख्यमंत्री फडणवीस आणि दानवे यांच्यात दोन्ही मतदारसंघात चर्चा झाली असून ती युतीच्या हिताची असल्याचे विश्‍वासनीय सूत्रांनी सांगितले. 

आठवड्याभरात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झालेल्या दानवे यांना अजुनही काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामूळे त्यांच्या मतदारसंघातील प्रचाराची धुरा औरंगाबाद-जालना येथील भाजपच्या पदाधिकारी, आमदार,जिल्हाध्यक्ष इतरांवर टाकण्यात आली आहे. तालुका निहाय दानवे यांचा प्रचार करण्यात येत आहे. दानवे आजारी असले तरी ते रुग्णालयात बसून मतदारसंघातील बैठका सभा यांचे नियोजन करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

संबंधित लेख