cm meeting maratha leaders | Sarkarnama

मराठा आंदोलनात पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार नाही : मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

मुंबई : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील असे सांगतानाच ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांच्यावरील गुन्हे मात्र मागे घेणार नाही. असे गुन्हे मागे घेतले तर अराजकता माजेल. आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

मराठा आंदोलनच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्रि अतिथिगृहावर मराठा संघटनांच्या प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी मुख्यंमत्री नारायण राणे उपस्थित होते. मराठा समाजातील आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्‍नांना फडणवीस यांनी उत्तर दिली. 

सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मेगा भरतीसंदर्भात मी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत. या भरतीत मराठा तरूण उपेक्षित राहणार नाहीत. जर उद्या काही लोक चर्चा करण्यास येणार असतील तर चर्चा करू. त्यामुळे आम्हाला प्रश्‍न सोडवायचा आहे. कोणाचा मान वाढविणे किंवा कमी करण्याचा प्रश्‍न उरत नाही. मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करू नये यासाठी तरूणपिढील समजावून सांगावे लागेल. मराठा समाजालाही राज्याची चिंता आहे. मराठा समाजाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

ज्या मराठा समाजसंघटना चर्चेसाठी उपस्थित नव्हत्या याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की त्यांच्याशी पुन्हा मी चर्चा करण्यास तयार आहे. आजच्या बैठकीला अनेक संघटनांच्या प्रतिनिधीनी पाठ फिरविल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स

संबंधित लेख