एका एसएमएसवर मुख्यमंत्र्यांनी केली लाखाची वैद्यकीय मदत ! 

एका एसएमएसवर मुख्यमंत्र्यांनी केली लाखाची वैद्यकीय मदत ! 

मुंबई : गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील गंगाराम पवार हे मजुरी करतात. त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाला दुर्दम्य आजाराने ग्रासलेले. कुठूनच मदत होत नसल्याने पवार कमालीचे हताश झालेले. खिशात अवघे 16 रुपये. अशातच त्यांचे एक नातेवाईक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवतात. तो एसएमएस वाचल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला मुख्यमंत्री लगेचच सूचना करतात. त्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे तातडीने कामाला लागतात, अन्‌ काही तासांतच तो चिमुरडा एका पंचतारांकित खासगी रूग्णालयात भरती होतो. 

एखाद्या चित्रपटातील कहाणी ऐकावी असा हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. वेदांत गंगाराम पवार या मुलाला विचित्र आजार जडला आहे. त्याच्या शरिरात रक्त बनण्याची प्रक्रिया थांबली आहे. त्यासाठी त्याच्यावर "बोन मॅरो ट्रान्सप्लंट" हा उपचार करावा लागणार आहे. पण त्यासाठी तब्बल लाख रुपयांची गरज होती. घरात अठरा विश्व दारिद्रय असलेल्या गंगाराम पवार यांना एवढ्या रकमेची जुळवाजुळव करणे केवळ अशक्‍य होते. पण पवार यांच्या बहिणीने, म्हणजे वेदांतच्या (रेणूका) आत्याने थेट मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविला. या मुलाला तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयातील वैद्यकीय कक्षाचे ओएसडी ओमप्रकाश शेटे यांना सुचना केली. 

आजारी व्यक्तींना मदत मिळवून देण्यासाठी शेटे नेहमीच आकाशपाताळ एक करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून सुचना येताच त्यांनी वेदांतच्या नातेवाईकांना लगेचच संपर्क साधला. त्याच्या आजाराची माहिती घेतली. मुंबईत हाजीअली या ठिकाणी बालकांसाठी एसआरसीसी नावाचे नव्यानेच एक खासगी पंचतारांकित रूग्णालय सुरू झाले आहे. या रूग्णालयाला शेटे यांनी आदेश देवून वेदांतला तिथे दाखल केले. सध्या वेदांत या रूग्णालयात उपचार घेत आहे. येत्या काही दिवसांत त्याच्यावर शस्त्रक्रिया होईल. 

वेदांतवर उपचार करण्यासाठी सुमारे 15 लाख रुपयांची गरज आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत काही लाखाची रक्कम दिली जाणार आहे, तर कक्षानेच पुढाकार घेऊन उर्वरीत रक्कम टाटा फाऊंडेशनमार्फत मिळवून देण्याची तजवीज केली असल्याचे सूत्रांनी"सरकारनामा"ला सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com