CM Held Up in Mumbai Due to Maratha Agitation | Sarkarnama

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईतच अडकले

प्रशांत बारसिंग
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुंबई : मराठा आंदोलनाच्या भडक्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सलग दोन आठवडे मुंबईत असून राज्याच्या इतिहासात बहुदा ही पहिलीच घटना आहे. सुट्टीचे दिवस धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल पंधरा दिवस मुंबईत आहेत.

मुंबई : मराठा आंदोलनाच्या भडक्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सलग दोन आठवडे मुंबईत असून राज्याच्या इतिहासात बहुदा ही पहिलीच घटना आहे. सुट्टीचे दिवस धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल पंधरा दिवस मुंबईत आहेत.

राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे 'शेड्यूल' अत्यंत 'बिझी' असते. आठवदयातील मंत्रिमंडळ बैठक, राजकीय नेत्यांना दिलेल्या भेटीच्या वेळा आणि शासकीय कामकाज वगळता मुख्यमंत्री राज्यभरातील विविध कार्यक्रमाना हजेरी लावतात. स्वतःच्या मतदारसंघात तर प्रत्येक मुख्यमंत्री आठवद्यातील एक दिवस तरी मुक्कामी असतात, प्रदेशात असतील तर किंवा अपवादात्मक परिस्थितीत यात थोडाफर बदल होतो. 

गेल्या 20 जुलै रोजी विधिमंडलाचे पावसाळी अधिवेश नागपुर येथे संपल्यावर मुख्यमंत्री  21 जुलै रोजी मुंबईत दाखल झाले. 22 जुलै रोजी अमित शहा मुंबईत होते. 23 जुलै रोजी आषाढ़ी एकादशीला मुख्यमंत्री पंढरपुरात श्री विट्ठल-राखुमाईची पूजा करणार होते. मात्र, राज्यात भडकलेल्या मराठा आंदोलनामुळे तसेच मराठा आणि धनगर समाजाने रोखण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. 

जळगाव आणि सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात देखिल त्यांना हजेरी लावता आली नाही. त्यामुळे संपूर्ण दोन आठवड़े मुख्यमंत्री मुंबईत अड़कुन पडले आहेत. कधी मंत्रालय, वर्षा निवासस्थान आणि सह्याद्रि अतिथिगृहावर शासकीय कामकाजात ते व्यग्र आहेत.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख