`अजित कमळ बघ; छगन कमळ बघ : मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

 `अजित कमळ बघ; छगन कमळ बघ : मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

मुंबई : बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनावरून राज्यभरात नवा गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या मुद्यावरून विरोधकांची खिल्ली उडवली.

सुलभ शिक्षण व वाचन यासाठी लहान मुलांना ‘ अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण’ असं शिकवले जाते याचा दाखला देत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या नावाशी याचा संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट करताच विधानसभा  हास्यकल्लोळात बुडाली. मात्र नवीन संख्यावाचनाची पध्दत थोडी बदलेली असली तरी त्यामधे मूळ उच्चार देखील कायम ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही  संख्यावाचनाबाबत अधिक तज्ज्ञांची समिती नेमून याचा विचार केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिले.

संख्या वाचनाच्या नव्या पद्धतीवर विरोधकांनी काल मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती. आज त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दात पलटवार  केला. बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात असलेल्या वाक्यांची उदाहरणे देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटे काढले. `दादा कमळ बघं, छगन कमळ बघं, हसन झटकन उठ, शरद गवत आण, अशी वाक्ये मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचून दाखवली आणि सभागृहात एकच हशा पिकला. या उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध नाही, असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

नव्या संख्यावाचनावर टीका करताना अजित पवारांनी काल मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस हे नाव आता फडण ‘वीस’ आणि शून्य असे म्हणायचे का, असा सवाल करत अजित पवारांनी नव्या संख्यावाचनाच्या पद्धतीला विरोध केला होता.

याबाबत आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री म्हणाले की, संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या शिफारशीनुसार पद्धत सोपी व्हावी म्हणून नव्या संख्यावाचाबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र हे संख्यावाचन केवळ वीस दोन असे नसून पुढे बावीसही लिहलेले आहे. मात्र याबाबत सभागृहाच्या भावना तीव्र भावना लक्षात घेऊन अधिक तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत विचार करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com