मुख्यमंत्री फडणवीसांचे मोदींना फिटनेस चॅलेंज! परदेशवारीतून थेट नीती आयोगाच्या बैठकीत!

मुख्यमंत्री फडणवीसांचे मोदींना फिटनेस चॅलेंज! परदेशवारीतून थेट नीती आयोगाच्या बैठकीत!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. फडणवीस हे नऊ ते सोळा जूनपर्यंत अमेरिका दोऱ्यावर होते. अमेरिकेतून सोळा तासांचा विमान प्रवास करून  १७ जूनच्या पहाटे साडे पाच वाजता ते दिल्लीत पोहोचले. लगेच सकाळी साडे नऊच्या नीती आयोगाच्या बैठकीला ते उपस्थितही राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही यांचा विमान प्रवासाचा असाच स्टॅमिना आहे. त्यांना `जेट लॅग`चा त्रास होत नाही. ते परदेशातील विमान दौरा असा आखतात की ते झोप विमानातच घेतात. विमानातून उतरल्यानंतर थेट दौऱ्याला आणि कामकाजाला सुरवात करण्याची मोदी यांची पद्धत आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचा नऊ ते सोळा जूनपर्यंत भरगच्च असा अमेरिका दौरा होता. अनेक कंपन्यांना भेटी, करार, मुलाखती, पुरस्काराचा सोहळा, गुंतवणुकीसाठी वाटाघाटी या दौऱ्यात पार पडल्या. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५ सालापर्यंत एक ट्रिलियन डाॅलर होणार असल्याची ग्वाही त्यांनी या दौऱ्यात दिली.

पहिल्यांदाच इतक्या दिवसांच्या दौऱयावर फडणवीस रवाना झाले होते. त्यामुळे त्यांना या कालावधीत राज्याची जबाबदारी मंत्र्यांच्या गटावर सोपवली होती. मुख्यमंत्री अमेरिकेत होते तरी त्यांचे महाराष्ट्रातील राजकारणवार लक्ष कमी झालेले नव्हते. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित नक्षली हल्ल्याच्या योजनेवर टीका केली होती. या टिकेला मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे अमेरिकेतून उत्तर दिले होते.     

आपला दौरा संपल्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास ते दिल्लीत पोहोचले. यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास नीती आयोगाच्या ब्रेन स्टार्मिंग बैठकीसाठी ते उपस्थित राहिले.  त्यांनी अमेरिका प्रवासानंतर केवळ चार तासांची विश्रांती घेतली आणि थेट नीती आयोगाच्या कार्य़ालयात गेले. त्यांच्या फिटनेसचे आणि कार्यक्षमतेचे सोशल मिडियात कौतुक नाही झाले तर नवलच! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com