CM Fadnvis shows sympthy to Sena MLAs | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे "गाजर' 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे लोढणे गळ्यात न बांधता एकहाती सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नाराज आमदारांना "गाजर' दाखवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर त्यांचे आमदार नाराज असल्याने मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अशा शिवसेना आमदारांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. 

विधान परिषदेवर निवडून आलेल्यांना मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत सुरुवातीपासूनच नाराजी होती. त्यातच हे मंत्री आमदार व पदाधिकाऱ्यांची कामे करत नसल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. या शिवसेना आमदारांची नाराजी मुख्यमंत्र्यांनी हेरली आहे. शिवसेनेचा नाराज आमदार खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील आमदार आल्यास त्याचे काम तत्काळ करून देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. 

""शिवसेनेचे मंत्री काही कामाचे नाहीत. अगदी सोपे काम होते. अनेक महिन्यांपासून मंत्री इकडून तिकडे नाचवत होते. पण, मुख्यमंत्र्यांना सांगितल्यावर पटकन काम झाले'', असे मराठवाड्यातील शिवसेनेच्या एका तरुण आमदाराने सांगितले. मुख्यमंत्र्यांची ही कार्यतत्परता म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचे मानले जाते.

एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न अवघे 23 आमदार कमी पडले म्हणून भंगले. त्यामुळे स्थिर सरकारसाठी शिवसेनेला बरोबर घ्यावे लागले. मात्र, शिवसेनेला सोबत घेतल्याने भाजपला त्रासच जास्त झाला. आगामी विधानसभा निवडणूक एकहाती जिंकायची असेल, तर सर्वांत मोठा शत्रू असलेल्या शिवसेनेला तडाखा देण्याखेरीज पर्याय नाही, असे भाजपच्या नेतृत्वाने हेरले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची कामे करून त्यांना उपकृत करायचे आणि आयत्या वेळी भाजपमध्ये प्रवेश द्यायचा, असे भाजपचे मनसुबे असल्याचे सांगण्यात येते. 

संबंधित लेख