CM Fadnavis asked Eknath Khadse to come forward | Sarkarnama

मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले , नाथाभाऊ पुढे या !

कैलास शिंदे 
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

गिरीश महाजनांनी दीप प्रज्वलन करतांना खडसेंच्या हाताला हात लावून 'दिपोस्तुते 'म्हटले.

जळगाव  :राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार बुधवारी (ता.10) होण्याची शक्‍यता आहे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळात पुन्हा संधी मिळणार कि नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. याबाबत त्यांनी सूतोवाच केले नाही. मात्र नाटयगृह उदघाटनाची फित कापतांना खडसेना पुढे येण्यासाठीहाक मारली आणि ते आल्यावरच  फीत  कापली .  

तर गिरीश महाजनांनी दीप प्रज्वलन करतांना खडसेंच्या हाताला हात लावून 'दिपोस्तुते 'म्हटले. मंत्रीमंडळ विस्ताराच्या अगोदरचे हे शुभसंकेत असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. 

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकित माजी मंत्री खडसे उपस्थित नव्हते.त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली त्यानंतर जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनीच त्याबाबत खुलासा करीत सांगितले, खडसे यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते येवू शकले नाहीत. मात्र दुपारी नाटयगृहाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. 

दुपारी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाटयगृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी खडसे उपस्थित होते,त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खडसे यांनी हस्तादोलन केले. त्यानंतर नाट्यगृहाचे फित कापतांना खडसे मागे राहिले. हीबाब लक्षात येताच फडणवीस फित न कापता थांबले त्यांनी "नाथाभाऊ पुढे या' अस म्हणत त्यांना पुढे बोलावून घेतले. त्यांना सोबत घेतले. त्यानंतरच फित कापली. 

त्यानंतर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन खडसे दिपप्रज्वलन करीत असतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या हाताला हात लावून संयुक्तपणे दीप प्रज्वलन केले. गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील सद्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर हे चित्र मात्र सकारात्मकच दिसत होते. या शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करतांना खडसे यांचा उल्लेख 'जेष्ठ नेते नाथाभाऊ'असा उल्लेख केला.  

 

संबंधित लेख