CM Fadanvis sanctions 119 crore for Ulhasnagar roads | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरकरांना दिली 119 कोटींची दिवाळी भेट  

दिनेश गोगी
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

शांतीनगर साईबाबा मंदिर ते डॉल्फिन क्लब, बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल ते व्हीनस चौक,   धोबी घाट रोड, श्रीराम सिनेमा ते एम्ब्रॉसिया हॉटेल,व  हिरा घाट ते डर्बी हॉटेल चौक असे हे पाच सिमेंट काँक्रीटचे रोड 119 कोटींच्या निधीतून साकारण्यात येणार आहेत.

उल्हासनगर  : मागच्या वर्षीच्या दिवाळीला दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पूर्तता करताना यंदाच्या दिवाळीला उल्हासनगरकरांना 119 कोटींच्या 5 काँक्रीट रोडची दिवाळी भेट दिली आहे. 

1996 साली महानगरपालिकेची स्थापना झाली.तेंव्हापासून प्रामुख्याने शिवसेनेचा सत्तेत मोठा वाटा होता.मात्र 2017 च्या निवडणुकीत शिवसेना सत्तेतून दूर झाल्यावर प्रथमच भाजपाच्या मीना आयलानी महापौर झाल्या.राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी लक्ष केंद्रित केल्याने भाजपा-साईपक्षाची हातमिळवणी झाल्याने भाजपाच महापौर पदाच स्वप्न पूर्ण झालं.

स्थायी समिती सभापती पदी साईपक्षाच्या कांचन लुंड विराजमान झाल्यावर कांचन व नगरसेवक शेरी लुंड यांनी राज्यमंत्री रविंद चव्हाण यांच्याकडे उल्हासनगरातील रोडसाठी राज्यशासना कडून निधी मिळावी अशी मागणी केल्यावर चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निधी मिळणेबाबत लक्ष वेधले.

आमदार ज्योती कलानी,  ओमी कलानी,नगरसेविका पंचम कलानी,नगरसेवक राजेश वधारिया यांनी मागच्या दिवाळीच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निधीच्या बाबत भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनाची  पूर्तता करताना ऐन दिवाळीच्या तोंडावर 119 कोटींच्या 5 सिमेंट काँक्रीट रोडची दिवाळी भेट दिल्याने उल्हासनगरकर सुखावून गेले आहेत . 

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार्यांत  श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे.तर सबका साथ शहर का विकास असा संदेश काही जण देत असून शहराचा विकास होऊ द्या,वाद नको असेही मत मासमीडियावर व्यक्त करत आहेत.

पप्पू कलानी यांच्या कालावधीत प्रथम उल्हासनगरात सिमेंट काँक्रीटचे रोड झाले.ते अद्यापही शाबूत आहेत एव्हडे पक्के काम या रोडचे झालेले आहे.याची पोचपावती राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी जाहिर सभेत दिली होती .

उल्हासनगरच्या रोडचे अनुकरण नंतर इतर शहरांनी केले अशी कबुली देखील गणेश नाईक यांनी दिली होती. आता एकत्रितपणे पाच रोडचे काम सुरू होणार असून त्याचे काम पप्पू कलानी यांच्या कालावधीतील रोड सारखे पक्के असणार काय? हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
 

संबंधित लेख