देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीत दडलं काय ? 

 देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीत दडलं काय ? 

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महापौर बंगल्यावर काय चर्चा झाली. मात्र या भेटीत दडलंय काय याची उत्सुकता महाराष्ट्राला अधिक आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन असून त्यांना राज्यभर अभिवादन करण्यात आले. त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मृतीस्थळावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्यात भेट झाली. ही भेट पंधरा मिनीट सुरू होती. या भेटीनंतर त्यानंतर हे दोघे एकत्र स्मृतीस्थळाला भेट देतील असे वाटत होते. पण, मुख्यमंत्री एकटेच तेथे आपल्या फौजफाट्यासह गेले. तेथे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे,रश्‍मी ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते. 

गेल्या काही महिन्यापासून शिवसेना भाजपवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहे. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दाही शिवसेनेने हातात घेऊन भाजपला आव्हान दिले आहे. राज्यात भाजप सरकारविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना भाजपवर आसूड ओढत आहे. तरीही शिवसेना आगामी निवडणुकीत भाजपची मंडळी शिवसेना आमच्या सोबत राहिल असा विश्वास व्यक्त करीत आहेत. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. मात्र त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे दिसले नाहीत त्यामुळे या दोन्ही पक्षाविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com