cm fadanavise attack congress | Sarkarnama

कॉंग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात: देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : देशात डावे फक्त नावापुरते उरले असून कॉंग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावे पक्ष आणि कॉंग्रेसवर केली आहे 

मुंबई : देशात डावे फक्त नावापुरते उरले असून कॉंग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावे पक्ष आणि कॉंग्रेसवर केली आहे 

मुंबईत मुख्यमंत्रीफडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की या राज्यांमधला विजय म्हणजे एक झलकच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला विकास आणि विश्वास, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे संघटन या मुळे भाजपाला त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये विजय मिळवता आला. जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर अविश्वास पसरवण्याचे काम करतात त्यांना या दोन्ही राज्यांच्या जनतेने उत्तर दिले आहे. 

भारतातील जनतेचा विश्वास मोदींवर आहे. कर्नाटकमध्येही भाजपचेच सरकार येईल याची आम्हाला खात्री आहे असे सांगून ते म्हणाले, की एवढे अमाप यश कधीही कुणालाही मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण देशाला पटले आहे हेच हा कौल सांगतो. 

एवढेच नाही तर देशात डावे हे फक्त नावाला उरले आहे. शनिवारी ईशान्य भारतात लाल सूर्य मावळला आहे आणि भगव्या सूर्याचा उदय झाला आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांचेही त्यांनी कौतुक केले.

संबंधित लेख